पिंपरी : निकालासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा | पुढारी

पिंपरी : निकालासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 28 उमेदवार आणि मतमोजणीच्या 14 टेबल यामुळे एका फेरीसाठी 30 मिनिटांचा कालावधी लागणार अहे. सर्व 37 फेर्‍या पूर्ण होण्यास रात्री आठ वाजणार आहेत. तसेच, पिंपळे गुरव, नवी सांगवी व सांगवीच्या 117 ईव्हीएममधील मतांची मोजणी शेवटी होणार आहे. त्यामुळे निकाल स्पष्ट होण्यासाठी रात्री उशिरापर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वांत मोठा मतदारसंघापैकी एक आहे. परिसरात सर्वत्र दाटलोकवस्ती असल्याने मतदारसंघात तब्बल 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यामुळे तब्बल 510 मतदान केंद्र आहेत. त्या केंद्रांवर रविवारी (दि.26) मतदान झाले. मते सामावलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) थेरगावच्या शंकरआण्णा गावडे कामगार भवनातील स्ट्राँग रूममध्ये कुलूपबंद आहेत. रिंगणातील 28 उमेदवारांना एकूण 2 लाख 87 हजार 479 इतके मतदान झाले आहे. हे प्रमाण 50.53 टक्के इतके आहे.

मतमोजणी गुरुवारी (दि.2) सकाळी आठला सुरू होणार आहे. अधिक संख्येने ईव्हीएम मशिन व तब्बल 28 उमेदवार व एक नोटा असे एकूण 29 मते मोजावी लागणार आहेत. त्यामुळे एका फेरीतील 14 टेबलवरील मोजणी पूर्ण होण्यास तसेच, सांख्यिकी नोंदणी करण्यास किमान 30 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. नंतरच्या फेर्‍यात हा कालावधी फेरीनिहाय 5 ते 10 मिनिटाने कमी होऊ शकतो. त्यानुसार, सर्व 37 फेर्‍या पूर्ण होण्यास रात्रीचे आठ वाजणार आहेत. त्यानंतर सर्व नोंदी पूर्ण करून भारत निवडणूक आयोगाकडे निकाल मेल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले हे विजयी उमेदवाराचे नाव घोषित करतील. त्यास किमान रात्रीचे दहा ते अकरा वाजू शकतात.

टपाली मतदानाचा एक टेबल असणार
टपाली मतपत्रिकेची मोजणी एका स्वतंत्र टेबलवर होणार आहे. टपाली मते एकूण 295 आहेत. तसेच, भारतीय सैनिकांची काही मते आहे. या मतांची मोजणी स्वतंत्रपणे केली जाते. त्यासाठी तहसीलदार दर्जाचा अधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतो. दोन पर्यवेक्षक व 2 सहायक निरीक्षक असतात. मतपत्रिका मोजणी प्रक्रिया खूपच संथ असल्याने त्यात बराच वेळ जातो.

एका टेबलसाठी तीन कर्मचारी
मतमोजणीच्या एका टेबलसाठी एकूण 3 कर्मचारी असणार आहेत. त्यात प्रत्येकी 1 पर्यवेक्षक, सहायक व सूक्ष्म निरीक्षक असतो. या कामासाठी विशेषत: महापालिका, महाविद्यालय, बँक व इतर आस्थापनेतील अकाउंट विभागाचे लिपिक नेमण्यात आले आहेत. त्यांची एकूण संख्या 36 आहे. तसेच, टाडा एन्ट्री करणारे, स्ट्राँग रूममधील ईव्हीएम आणणे व नेणे आदीसाठी स्वतंत्र पथक आहे.

पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी भागातील मोजणी अखेरीस असल्याने निकालाची उत्कंटा अखेरपर्यंत

चिंचवड मतदारसंघात एकूण 510 मतदान केंद्र आहेत. अनुक्रमांकानुसार मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत येथील केंद्रांवरील ईव्हीएम मशिनवरील मतांची मोजणी प्रथम केली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे निलख, नवी सांगवी व सांगवी असा उतरता क्रम आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा तसेच, भाजपकडे झुकलेला सर्वांधिक मतदार पिंपळे गुरव, नवी सांगवी व सांगवी या भागांत आहे. येथील केंद्रांवरील ईव्हीएमची मोजणी अखेरीस होणार आहे.

पिंपळे गुरवचे 332 ते 378 आणि 427 ते 442 हे मतदान केंद्र असून, एकूण 61 ईव्हीएम मशिन आहेत. नवी सांगवी व सांगवीचे 443 ते 457 आणि 468 ते 510 हे मतदान केंद्र आहेत. तेथे एकूण 56 ईव्हीएम मशिन आहेत. या ईव्हीएमची मोजणी अनुक्रमांकानुसार शेवटी असल्याने अखेरपर्यंत मतमोजणीचा कल लक्षात घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय निकालाचे चित्र स्पष्ट होणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

मोजणी संपण्यास रात्रीचे आठ होऊ शकतात
मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 14 टेबलवर 37 फेर्‍यांमध्ये मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ तैनात कर

Back to top button