पुणे : शरीरावरील पुरळ, फोड संसर्गजन्य नाहीत : डॉ. अब्दुल रझाक | पुढारी

पुणे : शरीरावरील पुरळ, फोड संसर्गजन्य नाहीत : डॉ. अब्दुल रझाक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ’शरीरावर येणारे पुरळ, फोड हे संसर्गजन्य विकार नाहीत. गेल्या काही वर्षांत यावर चांगले औषधोपचार उपलब्ध झाले आहेत. भारतात उपचार तुलनेने महाग आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औषधांचे दर औषधनिर्मिती कंपन्यांनी कमी करण्यास मदत केल्यास उपचार आणखी स्वस्त होऊ शकतील’, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अब्दुल रझाक यांनी व्यक्त केले.
द ऑटोइम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशन (एआयबीडीएफ) या ’शरीरावरील पुरळ’ या विषयावर जनजागृती आणि या विकारासंदर्भात मदतीसाठी काम करणार्‍या संघटनेचे लोकार्पण रझाक यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले, अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी, ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरद मुतालिक, अशोक सुरतवाला, वरिष्ठ विधीज्ञ जयंत हेमाडे आणि आर्थिक नियोजनकार अनिरुद्ध बंबावाले उपस्थित होते. डॉ. यशश्री रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सुरतवाला यांनी आभार मानले.

कोविड महामारीचा
सर्व देशांनी वैयक्तिक स्तरावर सामना करण्यास अधिक प्राधान्य दिले. जागतिक आरोग्यविषयक समस्या सोडविताना त्याबाबत वैयक्तिक दृष्टिकोन न ठेवता सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
                                                              – गौतम बंबवाले, भारताचे माजी राजदूत

Back to top button