देऊळगाव राजे : सौरमोटर पंपाचे दोन महिन्यांपासून अर्धवट काम | पुढारी

देऊळगाव राजे : सौरमोटर पंपाचे दोन महिन्यांपासून अर्धवट काम

देऊळगाव राजे (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : मलठण येथील सौरमोटर पंपाचे अर्धवट काम करून ठेकेदार राहिलेले साहित्य चोरीला गेल्याचा कांगावा करत आहे. लाभार्थी शेतकर्‍याला वेठीस धरण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून होत आहे. शेतक-यांने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मलठण येथील शेतकरी भरत शेळके यांना महाऊर्जा सोलर कृषिपंप योजनेंतर्गत साडेसात अश्वशक्तीचा सौरपंप मंजूर झाला होता. मंजूर सौरपंपाचे संबंधित ठेकेदाराने दोन महिन्यांपूर्वी अर्धवट काम केले आहे. तर उर्वरित कामाचे साहित्य चोरीला गेल्यामुळे ते ठेकेदार करत नसल्याची तक्रार लाभार्थी भरत शेळके यांनी महाऊर्जा कार्यालयाकडे दि. 14 जानेवारी रोजी केली आहे.

भरत शेळके यांना मंजूर सौरपंपाच्या कामासाठी ठेकेदार म्हणून अक्षय सौर कंपनीची निवड झाली होती. या कंपनीने शेळके यांच्या शेतात अर्धे सौरपॅनल व सांगाडा दोन महिन्यांपूर्वी बसविला आहे. परंतु अद्याप राहिलेले सोलर पॅनल व मोटर संबंधित कंपनीने बसविले नसून, त्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही दाखल न घेतल्याने लाभार्थी शेतकरी महाऊर्जा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

Back to top button