पिंपरी : महापालिका शाळेत मोठे बदल करणार; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती | पुढारी

पिंपरी : महापालिका शाळेत मोठे बदल करणार; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : येणार्‍या काळामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. या शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शाळेत प्रवेशासाठी पालिका शाळेच्या बाहेर पालकांची रांग लागतील, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे नुकतीच झाली.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, विद्यार्थी शिक्षा मुल्यांकन (क्यूसीआय) संस्थेचे मधु अहलुवालिया, एलएफआयचे योगेश शिंदे, आकांक्षा फाउंडेशनचे सुरेंद्र वाघमारे, सारथी हेल्पलाइनचे गौरव पवार, पाय जामचे शुभम बडगुजर आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या पालकांना देखील सोबत घेऊन चालले पाहिजे. अकॅडमी सोबतच मुलांच्या स्वास्थ्याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलाने अभ्यासासोबत मैदानी खेळामध्ये देखील सहभाग घेतला पाहिजे. खेळात निपूण असणार्‍या विद्यार्थ्यास क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. कार्यशाळेत इंग्रजी भाषा, राष्ट्रीय बाल स्वास्थ, सीएसआर कमिटी आदींची माहिती देण्यात आली.

Back to top button