पिंपरी : पोलिसांसमोर हाणामारी; पाच जणांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : पोलिसांसमोर हाणामारी; पाच जणांवर गुन्हा

पिंपरी : पोलिसांसमोर हाणामारी करणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास मावळ येथील माळवाडी येथे घडली. सोमनाथ आनंदा शिंदे (51, रा. तळेगाव स्टेशन), विशाल बाळू पारधे (22, रा. तळेगाव दाभाडे), नितीन पांडुरंग धोतरे (39, रा. तळेगाव दाभाडे), विकास जिजाबा येवले (31), सागर तानाजी दिवसे (32, दोघे रा. कान्हेवाडी, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस शिपाई प्रशांत सोरटे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात कारणावरून एकमेकांसोबत भांडण करत होते. दरम्यान, फिर्यादी पोलिस शिपाई प्रशांत सोरटे हे घटनास्थळी गेले असता आरोपींनी पोलिसांसमोर एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, मोठ्याने शिवीगाळ करीत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button