पुणे : जानेवारीत वाहन खरेदीचा उच्चांक | पुढारी

पुणे : जानेवारीत वाहन खरेदीचा उच्चांक

प्रसाद जगताप

पुणे : पुणेकरांनी नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात तब्बल 26 हजार 170 वाहनांची खरेदी केली. ही वाहन खरेदी इतर महिन्यांतील वाहन खरेदीच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. पुणेकर नागरिक नवीन वर्षात वाहन खरेदीला सर्वाधिक पसंती देतात. त्यामुळे अलीकडच्या वर्षातील डिसेंबर महिन्यात वाहन खरेदीला कमी पसंती मिळते आणि डिसेंबर महिन्यात कमी झालेली वाहनखरेदी जानेवारी महिन्यात होते. त्यामुळेच यंदा नवीन 2023 या वर्षातील जानेवारी महिन्यात सर्वाधिक वाहनांची खरेदी झाली असल्याचे समोर आले आहे, असे आरटीओ अधिकार्‍यांनी सांगितले.

…या वाहनांचा समावेश
1) मोटारसायकल – 15 हजार 666
2) कॅब – 566
3) एलएमव्ही – 7 हजार 113
4) गुडस – 1 हजार 147
5) अ‍ॅटोरिक्षा आणि अन्य – 1 हजार 105
– एकूण – 26 हजार 170

जानेवारीतील ’चॉईस नंबर’ विक्री…
चॉईस नंबर –
4 हजार 658
मिळालेला महसूल – 4 कोटी 80 लाख 1 हजार 57

नवीन वर्षांत आपल्या वाहनांची नोंदणी व्हावी, अशी वाहनचालकांची इच्छा असते. त्यामुळे बहुतांश वाहनचालक डिसेंबर महिन्यात वाहनांची खरेदी करीत नाहीत. त्याऐवजी ते नवीन वर्षांत वाहन खरेदी करण्यावर भर देतात. परिणामी, जानेवारीतील वाहन खरेदी वाढल्याने वाहन नोंदणी संख्या वाढते.
                                            – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Back to top button