पुणे : जिल्ह्यात 6 लाख बालकांची तपासणी | पुढारी

पुणे : जिल्ह्यात 6 लाख बालकांची तपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात ‘जागरूक पालक सदृढ बालक’ अभियान सुरू आहे. या अभियाना अंतर्गत राज्यातील सर्व 0 ते 18 वर्षे वयोगटातील 2 कोटी 61 लाख 31 हजार 548 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 93 हजार 175 बालकांची तर पुणे शहरातील 1 लाख 35 हजार 731 बालकांची तपासणी झाली आहे.

आतापर्यंत राज्यातील 50 हजार 686 शाळा, 37448 अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणी झाली आहे. यामध्ये शून्य ते सहा वयोगटातील 18 लाख 98 हजार 390 बालकांची तपासणी झाली आहे. तर 6 ते 10 या वयोगटातील 28 लाख 72 हजार 724, दहा ते 18 वयोगटातील 37 लाख 47 हजार 775 बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. दररोज किती बालकांची तपासणी झाली, त्यापैकी किती जणांना पुढील तपासणीसाठी, शस्त्रक्रियेसाठी पाठवले याची माहिती डॉक्टरांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जागरूक पालक सदृढ बालक अभियाना अंतर्गत आतापर्यंत राज्यातील 85 लाख 18 हजार 889 बालकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 6 लाख 84 हजार 145 बालके आजारी आढळून आली असून, यातील 50 हजार 364 बालकांवर उपचार करण्यात आले, तर 2 लाख 23 हजार 729 बालकांना पुढील उपचारांकरिता पाठविण्यात आले.

Back to top button