पुणे: क्रेडीट कार्डच्या बिलावर लागलेले अतिरिक्त चार्जेस कमी करुन देण्याच्या बहाण्याने घातला गंडा

Credit Card
Credit Card
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: क्रेडीट कार्डच्या बिलावर बँकेमार्फत लागलेले अतिरिक्त चार्जेस कमी करुन देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एकाला 89 हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने एका नामांकित बँकेच्या क्रेडीट कार्डचे बील मिळाल्यानंतर बँकेकडे ऑनलाईन तक्रार केली होती. सायबर चोरट्याने फिर्यादीशी संपर्क साधून टीम व्हिवर अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर बँकेमार्फत क्रेडीट कार्डवर लागलेले अतिरिक्त चार्जेस कमी करून देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करत फसवणूक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news