पुणे: आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत रासने यांच्यावर अखेर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे: आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत रासने यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमित ननावरे (वय.40) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटनिवडणुकीसाठी रासने यांनी नूतन मराठी विद्यालय प्रशाला बूथ क्रमांक 75 या मतदान केंद्रावर रविवारी (दि.26) सकाळी मतदान केले. या वेळी त्यांनी गळ्यामध्ये भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ असलेली पट्टी (उपरणे) घालून मतदान केले. निवडणूक प्रचार संपल्यानंतर रासने यांनी प्रचार करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button