पुणे : सिंहगड पायी मार्गावर महिला जखमी | पुढारी

पुणे : सिंहगड पायी मार्गावर महिला जखमी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगडावर आतकरवाडी पायी मार्गाने चढाई करताना रविवारी सडकेच्या मेटावरून कोसळून महिला पर्यटक गंभीर जखमी झाली. दरम्यान, बारावीच्या परीक्षा व उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंहगडावरील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. चारुता समीर कुलकर्णी (वय 50, रा. पुणे), असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सिंहगड वन विभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले, ’घटनेची माहिती मिळताच त सुरक्षारक्षकांसह स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला स्ट्रेचरवरून दुर्गम पाऊल मार्गाने खाली आणले. अतकरवाडी येथून उपचारासाठी नेण्यात आले.’

चारुता या पतीसह आतकरवाडी मार्गे आज सकाळी पायी चालत गडावर जात होत्या. त्या वेळी सडकेच्या मेटावर एका दगडावरून त्यांचा पाय घसरल्याने त्या खाली कोसळल्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुरक्षारक्षक नीलेश सांगळे यांनी स्थानिक कार्यकर्ते किसन पढेर, जय भवानी तरुण मंडळाचे महेश सांबरे, योगेश सांगळे सचिन भोंडेकर, सचिन पढेर, निखिल रांजणे, करण मिसाळ, कैलास सांगळे, ओंकार पन्हाळकर, पोपट भोंडेकर, अमोल पवार, उमेश सुपेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दिवसभरात गडावर एक हजारांवर वाहनांची नोंद झाली.

Back to top button