पुणे : पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान ; कसब्याची मतमोजणी कोरेगाव पार्कला, तर चिंचवडची थेरगावला

आदिवासी बहुल दुर्गम मेळघाटात विक्रमी 71.55 टक्के मतदान
आदिवासी बहुल दुर्गम मेळघाटात विक्रमी 71.55 टक्के मतदान
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे लक्ष वेधलेल्या पोटनिवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघात 50.06 टक्के, तर चिंचवड मतदारसंघात 50.47 टक्के मतदान झाले. काही भागांत किरकोळ स्वरूपाचा वाद झाल्याचे प्रसंग वगळल्यास दोन्ही मतदारसंघांत रविवारी शांततेत मतदान पार पडले. मतमोजणी गुरुवारी (दि. 2) होणार आहे. कसबा मतदारसंघात 1 लाख 38 हजार 18 मतदान झाले. तर चिंचवड मतदारसंघात 2 लाख 87 हजार 145 एवढे मतदान झाले. काही बूथवर सकाळी मतदारांच्या रांगा दिसल्या. मात्र, मतदारसंघाचा विचार केल्यास सकाळी मतदानाचा वेग कमी होता. सकाळी नऊ ते दुपारी एकच्या दरम्यान दोन्ही मतदारसंघांतील मतदान 18 ते 20 टक्क्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर उन्हामुळे मतदानाचा वेग मंदावला.

दुपारी साडेतीननंतर मात्र मतदानाचा वेग वाढत गेला. विशेषतः महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर पोहचल्या. दुपारी अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होती. कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली. तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट अटीतटीची लढत झाली. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 16 उमेदवार आहेत.

आकारमानाने आणि मतदार संख्येने हा मतदारसंघ लहान आहे. कसबा पेठ मतदारसंघात दोन लाख 75 हजार 679 मतदार आहेत. कसबा पेठ मतदारसंघात पहिल्या दोन तासांत साडेसहा टक्के, सकाळी अकरापर्यंत 8.25 टक्के, दुपारी एकपर्यंत 18.5 टक्के, दुपारी तीनपर्यंत तीस टक्के, दुपारी पाचपर्यंत 45 टक्के मतदान झाले होते.

चिंचवडमध्ये 50 टक्के मतदान
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली होती. त्यासाठी रविवारी मतदान झाले. एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदान असून, तब्बल 28 उमेदवार रिंगणात होते. सकाळी मतदानासाठी फारसा उत्साह दिसला नाही. सकाळी 7 ते 9 या वेळेत 20 हजार 27 जणांनी म्हणजे केवळ 3.52 टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर मतदारांचे प्रमाण वाढत गेले. सकाळी अकरापर्यंत 7 टक्के मतदान झाले. त्यानंतर घरातून मतदार बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. सकाळी 11 ते दुपारी एक या दोन तासांत सर्वांधिक 10 टक्के मतदान झाले. पाच तासांत 1 लाख 17 हजार 680 जणांनी मतदान केले. एकूण 20.68 टक्के मतदान झाले.

कडक ऊन असतानाही दुपारी एक ते तीन या वेळेत दहा टक्क्यांने वाढ होऊन 30.55 टक्क्यांवर मतदान पोहचले. उन्हाच्या झळा कायम असताना दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत 41.06 टक्के मतदान झाले. एकूण 2 लाख 33 हजार 620 मतदारांनी आपला हक्क बजावला. ऊन उतरल्याने आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे शेवटचा एका तासात नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले होते. शेवटच्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत एकूण 50 टक्के मतदान झाले. सुमारे 3 लाख नागरिकांनी मतदान केले. एक ते दोन केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आहेत.

14 टेबलांवर 20 फेर्‍यांमध्ये होणार मतमोजणी
कसबा पेठ मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 2 मार्च) कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात होणार आहे. त्यात एकूण 14 टेबलांवर 20 फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार आहे. चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे होणार असून, येथेही 14 टेबल असणार आहेत. मात्र, मतमोजणीच्या 37 फेर्‍या होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news