पुणे : मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य ; मतदानासाठी आलेल्या नव्वदीतल्या आजोबांचा संदेश | पुढारी

पुणे : मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य ; मतदानासाठी आलेल्या नव्वदीतल्या आजोबांचा संदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मी गेली अनेक वर्षापासून मतदानाचा हक्क बजावत आहे. आपल्या परिसराचा विकास व्हावा, असे वाटत असेल तर प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे, आणि मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा संदेश मतदान करण्यासाठी आलेल्या 90 वर्षांच्या महाजन काकांनी दिला. कसबा पेठ पोटनिवडणूकीला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सकाळच्या टप्प्यात हळूहळू नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.

तरुण, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. दिव्यांग नागरिकही मतदानासाठी येत आहेत. याचवेळी रविवारी सकाळच्या सुमारास नूमवि प्रशालेत आलेल्या 90 वर्षाच्या महाजन काकांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी साधना महाजन (वय 85) यादेखील होत्या. ते यावेळी म्हणाले, आपल्या परिसराचा विकास व्हावा, असे जर आपल्याला वाटत असेल, घरातून बाहेर निघून मतदान केले पाहिजे. विकास करणाऱ्या उमेदवाराला मतदान करून आपल्या परिसराचा विकास केला पाहिजे. असं त्यांनी सांगितले.

Back to top button