पुणे : गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो : हेमंत रासने | पुढारी

पुणे : गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो : हेमंत रासने

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांनी रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नू म वि प्रशालेत येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ‘गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलोय…’

असे सांगत बाप्पाच्या आशीर्वादासह जनता देखील आम्हाला आशीर्वाद देईल आणि मला भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी बोलताना विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. रासने यावेळी सहकुटुंब आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह मतदान करण्याचा हक्क बजावला.

Back to top button