पुणे : ‘उष्माघाताने मृत्यू; हा अपघात नव्हे’ | पुढारी

पुणे : ‘उष्माघाताने मृत्यू; हा अपघात नव्हे’

पुणे : शवविच्छेदन अहवालात ऊन लागल्याने मयतास हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. मात्र, ऊन लागल्यामुळे झालेला मृत्यू अपघाताच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत केलेली भरपाईची मागणी तक्रारदाराला दिली जाऊ शकत नसल्याचा निर्णय ग्राहक आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या संगीता देशमुख, सदस्या क्षितिजा कुलकर्णी यांच्या न्यायपीठाने दिला.

बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याचा 16 मे 2017 रोजी मृत्यू झाला. ऊन लागून अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत द ओरिएंटल इन्शुरन्स कंंपनीकडे विम्याचे दोन लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. तहसीलदारांमार्फत कंपनीकडे कागदपत्रे सादर केली. मात्र, विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती. विमा कंपनीने लेखी म्हणणे सादर केले. तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाती नसून, नैसर्गिक मृत्यू आहे. त्यांनी दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे, त्यामुळे महिलेची तक्रार फेटाळण्याची विनंती ग्राहक आयोगाकडे करण्यात आली.

Back to top button