Pune Metro Ganeshotsav: गणेशोत्सवात ४.६९ लाख प्रवाशांची मेट्रोवारी! ४१ तास सेवा

गणेशोत्सवात पुणे मेट्रोने ४ लाख ६९ हजार ५१३ प्रवाशांनी प्रवास केला. महात्मा फुले मंडई स्थानकावर सर्वाधिक ६६,५०३ प्रवाशांची नोंद; अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा.
Metro
MetroPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोला मोठी पसंती दिल्याचे प्रवासी संख्येवरून स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ४ लाख ६९ हजार ५१३ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

यामध्ये जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मार्गिका बदलणाऱ्या प्रवाशांची संख्या ९९ हजार २५५ इतकी आहे. त्यामुळे उत्सव काळात मेट्रो स्थानकांवरील गर्दीचे नियोजन हे प्रशासनासमोर महत्त्वाचे आव्हान ठरले आहे.

गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या हालचालींचे नियोजन केले आहे. विशेषतः मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडई, स्वारगेट आणि पीएमसी या स्थानकांवर मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा झाली.

Metro
Sus Mhallunge Water Supply: सुस-म्हाळुंगेकरांना पाण्यासाठी आणखी ६ महिने प्रतीक्षा

महात्मा फुले मंडई स्थानकावर सर्वाधिक ६६ हजार ५०३ प्रवाशांची नोंद झाली. त्यापाठोपाठ पीसीएमसी स्थानकावर ४६ हजार ३४१, स्वारगेट येथे ४२ हजार ८४५, रामवाडी येथे ३९ हजार ४१६ आणि पीएमसी स्थानकावर २४ हजार ५२९ प्रवाशांची नोंद झाली.

दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने गर्दीचे नियोजन आणखी कडक केले आहे. काही प्रमुख स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमनाची गेटनिहाय व्यवस्था बदलण्यात आली असून, प्रवाशांची गर्दी एका ठिकाणी होऊ नये, यासाठी प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित केले आहेत. महात्मा फुले मंडई स्थानकातही गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेडिंग केले आहे.

Metro
Mulshi Dam Water Pune: मुळशी धरणातून पुण्यासाठी पाणी आणण्याच्या हालचालींना वेग

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुका आणि भाविकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन मेट्रो सेवा सलग ४१ तास सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो हा महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक पर्याय ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news