पुणे : मतदानासाठी प्रशासन सज्ज | पुढारी

पुणे : मतदानासाठी प्रशासन सज्ज

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. 26) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यादृष्टीने मतदारांना मतदारयादीतील नाव शोधण्यापासून ते मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठीची व्यवस्था, अधिकारी कर्मचार्‍यांना तांत्रिक प्रशिक्षण, मतदार चिठ्ठ्या वाटप आदी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध विभाग स्थापन करून सुरक्षाव्यवस्था, पोलिस बंदोबस्त, वाहनांची व्यवस्था, अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, .

कसबा पेठ मतदारसंघातील मतदान केंद्रांवर पाणी, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, सहायक अधिकारी व कर्मचारी, उमेदवारांची पक्षनिहाय बैठकव्यवस्था, मदतीसाठी शाळांमधील राष्ट्रीय सेवायोजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि स्वयंसेवक, जेवणाची सोय आदी तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.वाहनांचे नियोजन असे आहे…मतदान यंत्रे (ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट) आणि मतदार याद्या आणि इतर सामग्री आणि अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) 43 मोठ्या बस, 7 छोट्या बस, 12 छोट्या जीप तैनात करण्यात आल्या आहेत.मतदानासाठी यापैकी एक ओळखपत्र हवेमतदार ओळखपत्र, पासपोर्ट (पारपत्र), वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) महसूलनिर्मिती, निर्देशांकाद्वारे (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तऐवज, खासदार-आमदार-विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड ग्राह्यधरले जाणार आहे.

असे आहेत मतदार…

एकूण : 2 लाख 75 हजार 679पुरुष : 1 लाख 36 हजार 984स्त्री : 1 लाख 38 हजार 690तृतीयपंथी : 5अनिवासी भारतीय (एनआरआय) : 114दिव्यांग (पीडब्ल्यूडी) : 6570सैनिक (सर्व्हिस व्होटर्स) : 3880 वर्षांवरील : 19 हजार 244अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्याझोनल अधिकारी : 25सूक्ष्म निरीक्षक : 11इतर अधिकारी कर्मचारी : 1 हजार 80राखीव कर्मचारी : 270 (25 टक्के)

Back to top button