

पुणे : ऑक्सिरिच प्रस्तुत दै. पुढारीच्या महामिसळ महोत्सवाच्या दुसर्या आवृत्तीचा भव्य शुभारंभ आज शनिवारी म्हात्रे पुलाजवळील डीपी रोडवरील सृष्टी लॉन्स येथे होत आहे. बिगबॉस फेम सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे हे या प्रसंगी उपस्थित राहणार असून या महोत्सवाचे ते प्रमुख आकर्षण असणार आहेत. आज (दि. 25) आणि रविवारी (दि. 26) हे सलग दोन दिवस सुरू असणार्या या खाद्य महोत्सवात पुणेकरांना परफेक्ट वीकएंड मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.
संपूर्ण राज्यभरातील विविध ठिकाणच्या मिसळींचे स्टॉल्स आता चोखंदळ पुणेकरांच्या खवय्येगिरीसाठी सज्ज झाले आहेत. दै. पुढारीच्या या उपक्रमाला पुनीत बालन समुहाचे चेअरमन व एमडी पुनीत बालन, सुरुची स्पाईसेसचे संचालक मयंक जैन, सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन डॉ. संजय चोरडिया, बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष संदीप जगताप व व्यवस्थापकीय संचालक सचिन ढोपे, चितळे बंधू मिठाईवाले यांचे संचालक इंद्रनील चितळे, तसेच पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे संचालक अजित गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुणेकर खवय्यांना या पुढारी महामिसळ महोत्सव पुणे – 2023 मध्ये सहभागी होता येणार आहे. सृष्टी लॉन्स येथे पार्किंगची मुबलक व्यवस्था असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
आजचे प्रमुख आकर्षण – आशीर्वाद तुझा एकवीरा आई फेम कलाकार
शनिवार दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजता
अमृता पवार, निषाद भोईर व सुरेखा कुडची
रविवार दि. 26 रोजी सायंकाळी 6 वाजता
अमोल बावडेकर, पायल मेमाणे (प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची)
'पुढारी'ने आयोजित केलेल्या मिसळ महोत्सव उपक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील मासाल्यांपासून तयार केलेल्या मिसळींचा आस्वाद घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील अठरा स्टॉल धारकांचा यात सहभाग आहे. पुणेकर खवय्ये या उपक्रमाला मागील वर्षी प्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद देतील, यात शंका नाही.
जान्हवी धारिवाल, व्यवस्थापकीय संचालिका, माणिकचंद ऑक्सिरीच
कोणताही खाद्य पदार्थाचा मुख्य घटक असतो त्यात वापरलेला मसाला ज्यामुळे पदार्थ चवदार होतो. आमच्या मसाल्याच्या नावातच आहे सुरुची म्हणजे पदार्थ चवदार होणारच. महोत्सवात आमच्या स्टॉलला भेट द्या.
– मयंक जैन, संचालक, सुरुची स्पाईसेस प्रा. लि.