पुणे : मतदारांनो, निर्भीडपणे मतदान करा ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन | पुढारी

पुणे : मतदारांनो, निर्भीडपणे मतदान करा ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय पोलिस बल, राज्य राखीव पोलिस दल, स्थानिक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
याबाबत शुक्रवारी (दि. 24) पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या वेळी मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन केले.विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा उपस्थित होते. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तब्बल 2789 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर नजर
संवेदनशील 9 मतदान केंद्रांवर पोलिसांची नजर आहे.

कसबा पेठ : प राजमाता जिजाबाई प्रायमरी शाळा, पालिका येथील दोन केंद्रे; प अब्दुल करीम हुसेन अत्तार कोर्टवाले उर्दू शाळा; प पुणे महानगरपालिका शाळा नंबर 34 आचार्य विनोबा भावे विद्यामंदिर  ;

बुधवार पेठ :  प शेठ नाथुबाई हुकुमचंद गुजराती शाळा येथील दोन मतदान केंद्रे; सदाशिव पेठ : प सुंदराबाई राठी सेवा सदन हायस्कूल; प गोपाळ हायस्कूल; शुक्रवार पेठ ः प आदर्श विद्यालय प्री प्रायमरी स्कूल.

Back to top button