पुणे, पुढारी वृत्तसेवा: वानवडी आणि वडकी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वानवडी आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पतीसोबत दुचाकीवर बसून चाललेल्याला मोटार चालकाने धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात 23 फेबु्रवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास वानवडीतील नेताजीनगर कॉलनी परिसरात घडला. पल्लवी सुरेश गोपीरेड्डी (वय 21 रा. मुंढवा ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक सोमनाथ महादेव राजमाने (वय 36 रा. शिवणे) याला पोलिसांनी अटक केली. सागर सुरेश गोपीरेड्डी (वय 32 ) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भरधाव टेम्पोचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात 21 फेबु्रवारीला दुपारी दीडच्या सुमारास सासवड-हडपसर रस्त्यावरील वडकीत घडला. विजय शिवशरण पाटील वय 48 रा. हडपसर असे ठार झालेल्याचे नाव आहे. या बाबत अनिकेत पाटील (वय 29) यांनी लोणी काळभारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक दाभाडे तपास करीत आहेत.