पिंपरी : उन्हामुळे ‘रसवंती’कडे नागरिकांचा ओढा | पुढारी

पिंपरी : उन्हामुळे ‘रसवंती’कडे नागरिकांचा ओढा

पिंपळे गुरव ः पुढारी वृत्तसेवा :  दिवसाचे तापमान वाढू लागल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. घशाला कोरड पडत असल्यामुळे नागरिकांचा ओढा रसवंती गृहाकडे वाढू लागला आहे. सफरचंद, चिकू, मोसंबी, संत्री या फळांचा रस घेण्यापेक्षा उसाचा रस पिण्याला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. उसाचा रस पित्तनाशक असल्यामुळे उन्हाळ्यात दिवसा रस प्यायल्याने शरीरास थंडावा मिळतो. उसाचा रस विविध रोगांवर गुणकारी असल्यामुळे रस पिण्याकडे अधिक कल वाढला आहे. सध्या सांगवी, पिंपळे गुरव परिसरात बिनाबर्फाचा रसदेखील जास्त दराने विकला जात आहे. उन्हाळ्यात पाण्याचा पर्याय म्हणून उसाच्या रसाकडे बघितले जाते. लहान मुलंदेखील आवडीने रस घेतात. सध्या रसाचे दर प्रतीलिटर साठ ते ऐंशी रुपये एवढा आहे.

उसाच्या रसाचे फायदे ः
रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव होतो.
उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.
रसामुळे उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यास मदत होते.
खोकला, दमा, मूत्ररोग आणि किडनीशी संबंधित रोगांवर गुणकारी आहे.
तोंडातील दुर्गंधी कमी होते.

Back to top button