पुणे : वीज दरवाढीला विरोधच | पुढारी

पुणे : वीज दरवाढीला विरोधच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीजदरवाढी संदर्भात गुरुवारी वीज नियामक आयोगाच्या वतीने पुण्यात ऑनलाइन जनसुनावाणी झाली. या सुनावणीकडे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. केवळ आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींसह वीज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपच्या वतीने राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी लेखी आक्षेप नोंदवले, तर श्रीकांत आचार्य यांनी वीज नियामक आयोगासमोर पक्षाची बाजू मांडली.

दिल्ली व पंजाबमधील जनतेला अनुक्रमे 200 व 300 युनिट प्रतिमाह मोफत वीज कशी दिली हे पटवून दिले. महावितरणने दाखवलेले डिस्ट्रीब्युशन लॉसचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, असा आरोप आचार्य यांनी केला. महावितरणच्या वीज खरेदीचे तसेच महावितरणचे कॅग संस्थेमार्फत फायनान्शियल ऑडिट करावे. हा अहवाल येईपर्यंत वीज दरवाढीला मान्यता देऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Back to top button