पुणे : मनसेची फळी भाजपच्या प्रचारात उतरली | पुढारी

पुणे : मनसेची फळी भाजपच्या प्रचारात उतरली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते बाळा नांदगावकर पुण्यात दाखल झाले आणि कसबा पेठेत मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेत त्यांनी काँग्रेसचा प्रचार करणार्‍या सात पदाधिकार्‍यांची हकालपट्टी केली. नांदगावकर यांच्या मार्गदर्शनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मनसेची संपूर्ण फौज आता भाजपचे उमेदवा रहेमंत रासने यांच्या प्रचारात उतरली आहे.

मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी हेमंत रासने यांच्यापाठीशीभक्कमपणे उभी राहिली आहे. याची दखल घेत विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनीही कसबा पेठेतील मनसे कार्यालयात जाऊन मनसे पदाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे कसबा विभागप्रमुख गणेश भोकरे, निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, नीता पालवे, राकेश क्षीरसागर, सारंग सराफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button