नगर: वृध्द व्यक्तीस मारहाण करुन पैश्याची लुट करणारी टोळी गजाआड | पुढारी

नगर: वृध्द व्यक्तीस मारहाण करुन पैश्याची लुट करणारी टोळी गजाआड

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील समशेरपुरकडून ठाणगावला मोटरसायकलवरुन जात असताना सुनील बाबुराव केदार (वय ६५) या वृध्दास मारहाण करत मोबाईल व पैश्याची लूट करणाऱ्या चार जणाच्या टोळीला गजाआड करुन २ लाख ३ हजार रुपयासह मुद्दे माल हस्तगत करण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते (वय २८), लखन डेरासिंग माचरेकर (वय २५), प्रेम विजय वाल्हेकर (वय २१), प्रशांत मंगलदास गिऱ्हे (वय २२) यांना अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

समशेरपुर येथुन ठाणगाणकडे जात असताना चिचखांड परिसरात चार अज्ञात इसमानी सुनील बाबुराव केदार यांना अडवत गाडीवरुन खाली ढकलले. त्यानंतर मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम ४२ हजार आणि मोबाईल घेऊन दोघेजण पळुन गेले होते. स.पो.नि. मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक भुषण हांडोरे, पो. ना. विठ्ठल शेरमाळे, पो.कॉ. अविनाश गोडगे, पो. कॉ. सुयोग भारती, पो. कॉ. आनंद मैड, पो. कॉ. आत्माराम पवार यांचे पथक समशेरपुर परिसरात लुटणाऱ्या टोळीवर लक्ष ठेवून होते. आरोपींचा शोध सुरु असताना ते मुथाळणे गावाच्या शिवारातील डोंगरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने गावकऱ्याच्या मदतीने चार जणांना ताब्यात घेतले.

Back to top button