पिंपरी : जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा तुफान रोड शो!

पिंपरी : जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा तुफान रोड शो!
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 22) वाकडमध्ये रोड शो केला. उघड्या गाडीतून लोकांना अभिवादन करत निघाले तेव्हा नागरिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले.

रोड शोमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विशेषतः तरुणाईची तुफान गर्दी उसळली होती. 'कमळ फुलू दे'च्या घोषणाबाजीने तरुणाईने एकच गलका केला होता. रोड शोदरम्यान सर्व रस्ते तुडूंब भरले होते. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे शक्तिप्रदर्शन पोटनिवडणुकीत लक्षवेधी ठरले.

मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोला सुरुवात केली. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेलपासून पुढे विमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले. त्यांची छबी मोबाईल कॅमेर्‍याने टिपताना लोक दिसत होते.

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोनिमित्त महायुतीच्या वतीने संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आले होते. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी उसळली होती. त्यांची झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. रोड शोच्या मार्गावर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. रस्त्याने ठिकठिकाणी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता.

रोड शोमध्ये कमळ फुलू दे आणि भाजपच्या विजयाच्या, महायुतीच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सगळीकडे माणसेच माणसे दिसत होती. नजर हटत नाही एवढी गर्दी झाली होती. रस्त्यांवर माणसांचा जत्थाच जत्था दिसत होता. रोड शोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. मुख्यमंत्रीही कधी हात उंचावून, तर कधी हात जोडून मतदारांना अभिवादन करताना दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news