पुणे : दहशत निर्माण करणाऱ्या तीन गुंडांची शिक्रापूरात पोलिसांनी काढली धिंड | पुढारी

पुणे : दहशत निर्माण करणाऱ्या तीन गुंडांची शिक्रापूरात पोलिसांनी काढली धिंड

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : उज्जैनचा कुप्रसिद्ध डॉन दुर्लभ कश्यप याच्या दशहत निर्माण करण्याच्या धर्तीवर इंस्टाग्रामवर दहशतीचे व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवत शिरूर आणि शिक्रापूर परिसरात दशहत निर्माण करणाऱ्या तिन गुंडाची शिक्रापूर पोलिसांनी धिंड काढत गुंडगिरी व दहशत करणाऱ्यांचा बिमोड करण्यास पोलीस सक्षम असल्याचा संदेश दिला आहे. विकी उर्फ दाद्या राजेश खराडे (वय 19, रा. हनुमान मंदिराजवळ कामठीपुरा शिरूर), आदित्य नितीन भोई (वय 20, रा. हनुमान मंदिराजवळ कामठीपुरा शिरूर), नल्लूआदिन जैनुद्दीन शेख (वय 19, रा. जाधव मळा शिरूर) अशी या आरोपींची नावे आहेत. शिक्रापूर पोलिसांनी या आरोपींची पुणे-नगर मुख्य रस्ता विविध चौक, कॉलनी, शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये धिंड काढली. या आरोपींना बघण्यासाठी सामान्य लोकांनी गर्दी केली होती. या आरोपींवर शिक्रापूर पोलीस हद्दीमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी 21 फेब्रुवारी रोजी टाकळी भीमा (ता. शिरूर) या परिसरात दरोडा टाकण्यासाठी गावठी पिस्तूल, धारदार चाकू, लोखंडी कोयता, मिरची, बॅटरी, रस्सी आदी हत्यारे घेऊन तयारीत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे दोन साथीदार पळून गेले होते. या गुन्ह्यातील आरोपी विकी खराडे हा सोशल मीडियात फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअपवर प्रभावी आहे. हत्यारांसह दहशतीचे रिल्स तो सोशल माध्यमातून टाकत असतो. दुर्लभ कश्यप या गुन्हेगाराचा चाहता असून त्याचे अनुकरण करून रिल बनवत असतो. तो बाल गुन्हेगार असताना त्यांने खून, आर्म्स अॅक्ट, जबरी चोरी असे गुन्हे केले आहेत. या गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीसअधीक्षक नितेश घटते, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे जे. एन. पंसरे ,सचिन होळकर, पोलीस हवालदार एस. एस. होनमाने, दांडगे, व्ही. जे. पाटील, निखिल रावडे, चितारे जी. व्ही. देवकर, किशोर शिवणकर, लखन शिरसकर यांच्या पथकाने केली.

Back to top button