पुणे : खेड तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको | पुढारी

पुणे : खेड तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको

राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत चुकीचा निर्णय जाहीर केल्याच्या कारणावरून  खेड तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवारी (दि २२) जाहीर निषेध करण्यात आला. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी पुणे – नाशिक महामार्गावर काही वेळ रास्ता रोको केला.

अमोल पवार,तालुका प्रमुख रामदास धनवटे,महिला जिल्हाप्रमुख विजयाताई शिंदे,जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी निषेधात्मक मार्गदर्शन केले.सुरेश चव्हाण, बाळासाहेब ताये, किरण गवारे,संतोष (पप्पु) राक्षे,सुदाम कराळे,अर्चना सांडभोर, कविता गिलबिले आदी यावेळी उपस्थित होते.

Back to top button