पुणे : ज्वारी, गहू, आटा, मैद्याचे दर उतरले; तूरडाळ, हरभराडाळ तेजीत | पुढारी

पुणे : ज्वारी, गहू, आटा, मैद्याचे दर उतरले; तूरडाळ, हरभराडाळ तेजीत

पुणे : नवीन गावरान ज्वारी आणि गव्हाची आवक वाढत असल्यामुळे दरात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. मिलबर गव्हाच्या दरात मात्र क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली. यामुळे आटा, रवा आणि मैद्याचे दर 50 किलोमागे 75 ते 100 रुपयांनी कमी झाले. मात्र, मागणी वाढल्यामुळे तूरडाळ आणि हरभराडाळीच्या दरात क्विंटलमागे 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली.

हुलग्याच्या दरातही क्विंटलमागे 500 ते 1000 रुपयांनी, तर साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे 500 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
गुजरात आणि मध्यप्रदेशातील नव्या गव्हाची आवक हळूहळू वाढत आहे. महाशिवरात्रीमुळे उत्पादक राज्यातील प्रमुख मंडया तीन दिवस बंद असल्यामुळे आवक अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. मात्र पुढील आठवडयापासून आवक सुरळितपणे सुरु होईल, अंदाज आहे. गेल्या आठवडयात मध्यप्रदेश तसेच सौराष्ट्र लोकवन गव्हाच्या दरात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली.

अन्न महामंडळाकडून स्वस्त दराने हलक्या प्रतीच्या गव्हाची मोठया प्रमाणात विक्री सुरु आहे. यामुळे मिलबर गव्हाच्या दरात आठवडयाभरातच सुमारे 400 रुपयांनी घसरण झाली. यामुळे आटा, रवा आणि मैद्याचे दरही 50 किलोमागे 75 ते 100 रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले. येत्या पंधरा दिवसात सर्व राज्यातील गव्हाची मुबलक प्रमाणात आवक होईल, त्यानंतर भावात किती नेमकी किती घट होईल आणि भाव कोठे स्थिरावणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे चांडक ट्रेडींग कपंनीचे भागीदार राजेंद्र चांडक यांनी सांगितले. नगर जिल्हयातील जामखेड आणि खर्डा येथून नव्या गावरान ज्वारीची आवक वाढत असून गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली.

साखर, गूळ स्थिर
आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवडयात साखरेचे दरस्थिर होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3475 ते 3525 रुपये होता. गुळाची आवक नियमितपणे होत आहे. महाशिवरात्रीमुळे गुळास मागणी बरी होती. मात्र भावात फारसा फेरबदल आढळला नाही.

तूरडाळ, हरभराडाळ, हुलगा दरात वाढ
हंगामाचा कालावधी असुनही यंदा तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात झाल्यामुळे ऐन हंगामकाळातच तूरडाळीचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. आगामी होळीच्या सणानिमित्त हरभराडाळीस मागणी वाढल्याने दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ झाली. नवीन हंगाम सुरु झाल्यनंतर मध्यंतरी हुलग्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र अलिकडेच तुटवडा निर्माण होऊन भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या काही दिवसातच हुलगा दरात क्विंटलमागे 800 ते 1000 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

महाशिवरात्रीमुळे गेल्या आठवड्यात साबुदाणा, भगर, शेंगदाणा या जिनसांना मोगणी चांगली होती. मागणी वाढल्यामुळे साबुदाण्याचे दर क्विंटलमागे 400 ते 500 रुपयांनी वाढले. शेंगदाण्याचे कडाडलेले दर कायम होते तर भगरीचे दर टिकून होते.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) : 3475-3525 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेलः 2475-3325, सरकी तेल 1750-2100, सोयाबीन तेल 1800-2000, पामतेल 1450-1700, सूर्यफूल रिफाईंड तेल 1800-2000, वनस्पती तूप 1400-1875, खोबरेल तेल 2250 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3300-3600, एम.पी. लोकवन 3200-3400, सिहोर नं. 1 5000-5200, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3400-3600, मिलबर 2500-2600रु. ज्वारी : गावरान नं. 1-5300-5500, गावरान नं. 2-4700-5000, नं. 3 430-4500, दूरी 3500-4000 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.
गूळ : गूळ एकस्ट्रा 3700-3900, गूळ नं. 1 3500-3650, गूळ नं. 2 3350-3450, गूळ नं.3 3150-3300, गूळ नं. 4 3000-3100, बॉक्स पॅकिंग 3400-4600 रु. डाळी : तूरडाळ 9500-11400, हरभराडाळ 5900-6100, मूगडाळ 9500-9800, मसूरडाळ 7300-7400, मटकीडाळ 9900-10000, उडीदडाळ 9000-10200 रु. कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा- 7500-8000 चवळी 7500-8500, मसूर 6600-6700, मूग 8800-9000, मटकी गावरान 10500-11500, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000, मटकी राजस्थान 8000, मटकी सेलम 13000-13500, वाटाणा हिरवा 5800-6000, वाटाणा पांढरा 6500-6600, काबुली चणा 12000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 6500, साबुदाणा नं.2 6200, साबुदाणा नं.3 6000 रु. वरई भगर :11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1300-1600 रु. शेंगदाणा : जाडा 12500-13000, स्पॅनिश – 12500, घुंगरु 11500, टीजे 10700-10800 रु. धने : गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल : 2675-2725, पिवळा 2650-2700, पांढरा 3000-3200 रु. पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450-475, सुरती 475-500 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1700-1775, रवा 1700-1775, मैदा 1700-1775, बेसन :- (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 260, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु.
नारळ : (शेकडयाचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1500-1550, सापसोल 2000-2700 रु.

Back to top button