पिंपरी : उद्घाटन घाईचा परिणाम ; वर्षभरानंतरही मेट्रोची धाव फुगेवाडीपर्यंतच | पुढारी

पिंपरी : उद्घाटन घाईचा परिणाम ; वर्षभरानंतरही मेट्रोची धाव फुगेवाडीपर्यंतच

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतरावर मेट्रो सुरू करण्यात आली. मेट्रोचा श्री गणेशा होऊन एक वर्ष होत आले तरी, अद्याप पुढील मार्गावरील कामे अर्धवट स्थितीत असल्याने मेट्रोची धाव एक मीटरनेही वाढलेली नाही. प्रवाशांविना मेट्रो रिकामीच धावत असल्याने महामेट्रोचे दरमहा लाखोंचे नुकसान होत आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्चला पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. त्याच दिवसापासून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. सुरूवातीला उत्सुकता म्हणून नागरिकांनी मेट्रो सफरीस मोठा प्रतिसाद दिला. मात्र, दोन ते तीन महिन्यात मेट्रोची नवलाई घटली. सध्या ती रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे.
मेट्रो सुरू झाल्याने उर्वरित कामे वेगात पूर्ण करण्यावर महामेट्रोने भर दिल्याचा दावा केला होता.

मात्र, मेट्रो सुरु करून वर्ष होत आली तरी, अद्याप कामे अपूर्णावस्थेत आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत पिंपरी ते पुण्यातील सिव्हील कोर्ट स्टेशनपर्यंत मेट्रो नागरिकांसाठी खुली करण्याचे महामेट्रोचे कार्यकारी व्यवस्थापक डॉ. बृजेश दीक्षित यांनी जाहीर केले होते. मात्र, फेब्रुवारी 2023 उजाडला तरी, मेट्रो काही पुण्यापर्यंत पोहोचली नाही. फुगेवाडीच्या पुढे मेट्रोची धाव नसल्याने नागरिकांनी मेट्रोकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे महामेट्रोचे महिन्याला लाखोंचे नुकसान होत आहे. दरम्यान, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम, काव्य वाचन, शूटींग, महिला मेळावा, ढोल वादन आदींसाठी स्टेशन व मेट्रो भाड्याने दिली जात आहे. तसेच, स्टेशनला प्रायोजकत्व देणार्‍या खासगी कंपन्यांचे नाव दिले जात आहे. त्यावरून महामेट्रोवर टीका केली जात आहे.

विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतर मार्गाचा विस्तार?
चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे. पिंपरी ते सिव्हील कोर्ट मेट्रो सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. मात्र, ती आचारसंहिता संपल्याशिवाय सुरू करता येणार नाही. खडकी येथील जागा संरक्षण विभागाकडून ताब्यात येण्यास विलंब झाल्याने त्या पट्ट्यातील काम उशीराने सुरू झाले. तसेच, स्टेशनची उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, असे महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी

Back to top button