शिरूर तालुक्यातील 11 गावांतील सोसायट्यांचे वाजले बिगुल | पुढारी

शिरूर तालुक्यातील 11 गावांतील सोसायट्यांचे वाजले बिगुल

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीसह निमगाव म्हाळुंगी, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, बाभुळसर खुर्द, कुरुळी, धुमाळवाडी, कोंढापुरी, रांजणगाव सांडस व शिरूर ग्रुप या 11 गावांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

शिरूर सहायक निबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज , छाननी, माघारी, चिन्हवाटप याबाबतचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील महिन्यात मतदान होणार आहे. काही गावांमध्ये बिनविरोधची परंपरा कायम राहणार की बदलत्या राजकीय समीकरणामुळे राजकारण तापणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

सोसायट्यांच्या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून सोसायटीच्या माध्यमातून गावात आपल्या पक्षाचा पॅनेल निवडून आणून पक्षश्रेष्ठींपुढे आगामी काळात प्रबळ दावेदार बनण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button