पुणे: शिवभक्तांनी साकारल्या 267 मातीच्या पिंडी | पुढारी

पुणे: शिवभक्तांनी साकारल्या 267 मातीच्या पिंडी

पुणे: महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील शिवभक्तांनी मातीच्या 267 महादेवाच्या पिंडी साकारल्या आहेत. या पिंडीची विधिवत पूजा करून रूद्र अभिषेक करण्यात आला. कात्रज येथील प्रतीक कदम यांच्या कुटुंबाने या पिंडी हाताने साकारल्या. जवळपास 267 पिंडी साकारण्यासाठी 12 तास लागले. कदम कुटुंब दरवर्षी शिवरात्रीला मातीच्या पिंडी साकारतात.

या सर्व पिंडीची आज पूजा करून उद्या पाण्यामध्ये अर्पण करण्यात येतात. विसर्जन केलेल्या पिंडीची माती ही झाडांना अर्पण केली जाते. यामधून एक सामाजिक संदेशही कदम कुटुंबाकडून देण्यात आला आहे. शिवाय या पिंडीला अर्पण करण्यात आलेले तांदूळ, प्रसाद वाया न घालवता गरिबांना दान करण्यात येतो, अशी माहिती कदम यांनी दिली.

Back to top button