आंबेगावच्या पूर्व भागात कुत्र्यांची दहशत | पुढारी

आंबेगावच्या पूर्व भागात कुत्र्यांची दहशत

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मोकाट कुर्त्यांची दहशत सुरूच आहे. रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या धसका विशेषत: दुचाकीस्वारांनी घेतला आहे. मोकाट कुर्त्यांमुळे रस्त्यांवर सतत अपघात देखील होत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोकाट कुर्त्यांची संख्या जास्त आहे. रस्त्यावरच टोळीने ही कुत्री फिरतात.

कुत्र्यांच्या धसका दुचाकीचालकांनी घेतला आहे. यापूर्वी कुर्त्यांमुळे अनेक दुचाकीचालक रस्त्यावर गाडीवरून खाली पडले आहेत. ही कुत्री दुचाकींच्या मागे धावतात. यामुळे दुचाकीचालकांची भंबेरी उडते. शाळकरी मुलांमध्ये देखील मोकाट कुर्त्यांची भीती आहे. या कुत्र्यांच्या प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Back to top button