पुणे : काँग्रेस शेवटचे दोन दिवस ‘महात्मा गांधीं’ना आणणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : काँग्रेस शेवटचे दोन दिवस ‘महात्मा गांधीं’ना आणणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी निवडणूक आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये कसब्यात काँग्रेस महात्मा गांधींना आणणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.
लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) आयोजिलेल्या 'विजय संकल्प' मेळाव्यात पाटील बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, अमर पुणेकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कसबा पेठमधील पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने नसून, ती भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी आहे. काँग्रेस खासदारांची संख्या एवढी कमी आहे की, त्यांना साधे लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून घेण्याएवढ्या जागा मिळाल्या नाहीत. पण, पंतप्रधान भाजपचे, राष्ट्रपती भाजपचे, उपराष्ट्रपती भाजपचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक सेवा दिल्या आहेत.

मोदी गरिबीत जगले. मात्र, गांधी कुटुंब श्रीमंतीत जगले. मोदींनी सत्तेत आल्यापासून गरिबांसाठी काम करण्यास सुरुवात केली. विधानसभेमध्ये जाऊन कायदे केले जातात, सत्तेत असलेल्या पक्षाला कायदे करता येतात. आता सत्तेत कोण आहे? भाजप-शिवसेना. कोरोना काळात आपण जिवंत राहिलोत, याचे कारण मोदी आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण केले. याशिवाय अनेक देशांना लसदेखील पुरविल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news