त्रास गिरीश बापटांना होत होता तर यातना आम्हाला, म्हणून ‘हा’ नेता करणार नाही आज प्रचार | पुढारी

त्रास गिरीश बापटांना होत होता तर यातना आम्हाला, म्हणून 'हा' नेता करणार नाही आज प्रचार

पुणे : कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीत सध्या सर्वच उमेदवारांचा धुमधडाक्यात प्रचार सुरु आहे. पोटनिवडणुकीमुळे मतदार संघ परिसरात गरम वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे यांनी याच पोटनिवडणुकीच्या रंगतदार प्राचाराच्या वाातवरणात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांना आजारी असतानादेखील मैदानात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. गिरीश बापट यांची अशी अवस्था पाहून हिंदू महासंघाने प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचे दवेंनी मेसेज करत माध्यमांना ही माहिती दिली आहे.

भाजपचा हा सगळा प्रयत्न फक्त पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सुरु असल्याचे आनंद दवे म्हणाले. ते पुढे म्हणाले यासाठी भाजप खासदार गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल तर त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहेत. बापट यांच्याकडे पाहून काल मला दुःख झाले. बापटांना आमच्यामुळे त्रास होत असल्यामुळे त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नसल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे.

नेमकं आनंद दवे यांनी मेसेज मध्ये काय म्हटलंय?

बापट पाहून पर्रीकर आठवले…आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही त्रास बापट साहेबांना होत होता… पण यातना आम्हाला जाणवत होत्या. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे, असं त्यांनी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलंय.

Back to top button