पिंपरी : उमेदवारांच्या खर्चाची तपासणी 20, 24 फेब्रुवारीला | पुढारी

पिंपरी : उमेदवारांच्या खर्चाची तपासणी 20, 24 फेब्रुवारीला

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी नुकतीच पार पडली. उमेदवारांना प्रचार खर्चासाठी 40 लाख रुपयांची मर्यादा देण्यात आली आहे. त्या मर्यादेत खर्च होतो आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग तैनात करण्यात आला आहे. त्या विभागाकडून आलेल्या अहवालानुसार उमेदवारांच्या प्रचार खर्चाची नोंद शॅडो रजिस्टरमध्ये केली जात आहे. निवडणूक खर्चाच्या नियमानुसार उमेदवाराने केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी केली जात आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी व तिसरी तपासणी अनुक्रमे 20 आणि 24 फेब्रुवारीला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत केली जाणार आहे.

खर्चाच्या तपासणीसाठी खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडीओ पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये इतकी आहे. एकूण 28 उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यांचे दररोजच्या खर्चाचे बिले व पावत्या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडीओ नियंत्रण व पाहणार्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचार खर्च नोंदवला जात आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Back to top button