बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ | पुढारी

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘सीसीटीव्ही’

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : वळती ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगातून गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यासाठी एक लाख 10 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. प्रामुख्याने बिबट्याचे हल्ले रोखणे आणि वाढत्या चोऱ्यांवर अंकुश बसावा, हा यामागील उद्देश असल्याची माहिती सरपंच आनंद वाव्हळ यांनी दिली.

वळती परिसर बिबट प्रवणक्षेत्रात येतो. येथे बिबट्यांचा सतत वावर आहे, तसेच या परिसरातील चोरीच्या घटनाही वाढू लागल्या होत्या. त्यामुळे गावात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे होते. त्यानुसार गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुख्य चौक, मुक्तादेवी मंदिर आदी ठिकाणी 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगातून एक लाख 10 हजार रुपयांचा खर्च केला.

सरपंच वाव्हळ म्हणाले की, गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे होते. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून 1 लाख 10 हजार रुपये खर्चून सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. या यंत्रणेमुळे चोरीच्या घटनांना निश्चित आळा बसेल आणि बिबट्यांच्या हल्ल्यांपासूनदेखील नागरिकांची सुरक्षा करता येईल.

Back to top button