पुणे : लाल महालात रंगला जिजाऊंच्या लेकींचा झंझावात | पुढारी

पुणे : लाल महालात रंगला जिजाऊंच्या लेकींचा झंझावात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे आयोजित शिवमहोत्सवात शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पाच ते चाळीस वयोगटांतील मुले व जिजाऊंच्या लेकींचा ’झंझावात’ शिवप्रेमींना पाहता आला. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मर्द मावळ्यांनी व जिजाऊंच्या लेकींनी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरीगदगा, सुरुळ, लिंबू काढणी अचूकपणे दोन तुकडे करणे आदी कलागुणांचे सादरीकरण केले. मर्दानी खेळांच्या माध्यमातून मुलींना स्वरक्षणाचे धडे देऊन त्यांचे मन, मनगट आणि मेंदू कणखर बनविण्याचे कार्य छत्रपती शिवाजीराजे मर्दानी आखाडा, छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील विजय आयवळे पाटील, विनायक सुतार, वैभव मोहोळ, राहुल मोहिते यांनी सुरू केले आहे.

या प्रसंगी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे प्रशांत धुमाळ, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, विराज तावरे, नीलेश इंगवले, रोहित ढमाले उपस्थित होते. मुकेश यादव, अक्षय रणपिसे, सचिन जोशी, मंदार बहिरट, युवराज ढवळे, अभिषेक वडघुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

Back to top button