पुणे : बापटांना प्रचारात उतरविण्याची खेळी : अजित पवार | पुढारी

पुणे : बापटांना प्रचारात उतरविण्याची खेळी : अजित पवार

पुणे : कसबा पेठेत भाजपचे वर्चस्व कायम राहावे या उद्देशाने आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरविण्याची खेळी भाजप खेळत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. शिवाजीनगरमधील श्री वृध्देश्वर सिध्देश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कसबा पेठ मतदारसंघाच्या निकालाबाबत काळजी वाटू लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज बापट कसबा पेठेच्या निवडणुकीच्या काळजीपोटी सक्रीय झाले, असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, बापट पक्षादेश मानणारे असून, त्यांनी अनेक वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे त्यांना केलेल्या आग्रहापोटी ते प्रचारात सक्रीय झाले आहेत. फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्यास पवार यांनी नकार देत मी यापूर्वी बोललेल्या मतावर ठाम असल्याचा पुनरूच्चार केला. शपथविधीबद्दल बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button