

पुणे : पुण्यात कसबा पेठ पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये ट्विटर वॉर सुरु झाले आहेत. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यात ट्विटरवर वादावादी सुरु झाली आहे. मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात हा वाद सुरु झाल्याचं आपल्याला पाहिला मिळत आहे.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना एका ट्विटवर सडकून टीका केली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला उमेदवारी न देता कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. यामुळे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांच्यावर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे.
साईनाथ बाबर यांच्या ट्विटला प्रशांत जगताप यांनी उत्तर देत बाबर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये. तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे. तू फक्त मन लावून नाचायचं काम कर, अशा शब्दांत त्यांनी ट्विट केलं आहे.
सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षाकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. बॅनरबाजी आणि सभांमधून एकमेकांवर निशाणे साधण्याचा प्रकार सुरु आहे. त्यातच आता ट्विटरवरदेखील वादावादी सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा होत आहे.