पिंपरी : सर्दी, खोकला तापाने ग्रस्त रुग्ण वाढले | पुढारी

पिंपरी : सर्दी, खोकला तापाने ग्रस्त रुग्ण वाढले

मोशी : पुढारी वृत्तसेवा :  वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला असून खाजगी रुग्णालयात सध्या पालकांची व रुग्ण लहान मुलांची गर्दी दिसू लागली आहे.  सर्वाधिक रुग्ण विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांचा निश्चित, असा आकडा उपलब्ध नाही. मात्र, सध्या जास्त प्रमाणात सर्दी खोकल्यानेच ग्रस्त लहानमुले रुग्णालयात दाखल होत असल्याचा सर्वच ठिकाणच्या रुग्णांलयांचा दावा आहे.

सध्या वातावरणात कधी ऊन, कधी थंडी तर, कधी गार वारे, असे चित्र दिसून येत आहे. यामुळे त्याचा परिणाम विपरित परिणाम लहान मुलांच्या प्रकृतीवर होत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर डास असल्याने तापाचे रुग्ण देखील वाढत आहे. काही लहान मुले डेंग्यू,मलेरिया यांनी देखील ग्रस्त आहेत. यामुळे पालकांची मात्र चिंता वाढली आहे.

Back to top button