मान्सून हंगाम संपला, परतीचा पाऊस ६ ऑक्टोबरपासून | पुढारी

मान्सून हंगाम संपला, परतीचा पाऊस ६ ऑक्टोबरपासून

पुणे : आशिष देशमुख

यंदाचा मान्सून हंगाम 30 सप्टेंबर रोजी संपला असून मान्सून परतीचा प्रवास पूर्व राजस्थानातून 6ऑक्टोबरच्या सुमारास सुरु होईल. महाराष्ट्रातून तो परतीच्या वाटेला निघण्यास 12 ऑक्टोबर उजाडणार आहे.दरम्यान शाहीन चक्रीवादळ पाकिस्तान च्या दिशेने निघाले असल्याने राज्यात अतिवृष्टीची शक्यता मावळली आहे.

यंदा मान्सून ब्रेक झाल्याने परतीचा प्रवास महिना भराने लांबला आहे.दरवर्षी मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास निघतो.मात्र यंदा 6 पासूनऑक्टोबर तो सुरु होत आहे.जुलै ऑगस्ट मध्ये पावसाने ओढ दिली मात्र सप्टेंबर मध्ये त्याने ती कसर भरुन काढली संपूर्ण राज्यात सरासरी पेक्षा 19 टक्के पाऊस जास्त झाला.

मराठवाड्यात तर 68 टक्के पाऊस जास्त झाल्याने त्या भागात ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.शाहीन चक्रीवादळाचा प्रवास गुरुवारी पाकिस्तान,मरकत च्या दिशेने सुरु झाल्याने त्याचा परिणाम फक्त तळकोकणा पुरता राहिल मात्र राज्यात जी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली होती ती आता मावळली असल्याचे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

मराठवाड्यात कमी दाबामुळे जास्त पाऊस..

यंदा मराठवाड्यात सप्टेंबर मध्ये जो पाऊस पडला ती ढगफुटी हेती का या प्रश्नावर दिल्ली येथील हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा म्हणाले, ढगफुटी होती की नाही हे सांगणे कठीण आहे मात्र मराठवाड्यावर कमी दाबाचा पट्टा असल्याने जास्त पाऊस झाला.

4 तारखेपर्यंत मध्यम पाऊस

शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टी पासून लांब गेल्याने अतिवृष्टी होणार नाही मात्र 1 ते 4 ऑक्टोबर या कालावधित कोकण,मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

यंदाच्या हंगामात 50 टक्के महाराष्ट्र निळाशार..

फक्त मराठवाड्यात अतिवृष्टी : (4 जिल्हे) (गडद निळा रंग)
जालना : सरासरी पेक्षा 83 टक्के जास्त राज्यात सर्वाधिक
परभणी:परभणी 65 टक्के जास्त
औरंगाबाद: 64 टक्के जास्त
बीड:66 टक्के

साधारण पाऊस हिरवा रंग (17 जिल्हे)

पालघर (19), मुंबई (1), पुणे (4), सातारा (17), सांगली (उणे 9), कोल्हापूर (18), नंदुरबार (उणे 6), बुलढाणा (6), अकोला (5), हिंगोली (9), अमरावती (उणे 7), वर्धा (10), नागपूर (15), चंद्रपूर (3), बुलढाणा (उणे 3), गोंदिया (उणे 7), गडचिरोली (उणे 13).

मुसळधार पावसाचे जिल्हे (14 जिल्हे)

मुंबई उपनगर (43%), ठाणे (21%), रत्नागिरी (33), सिंधुदुर्ग (31), धुळे (36), नाशिक (21), नगर (32), सोलापूर (25), जळगाव (25), उस्मानाबाद (36), वाशिम (24), लातूर (32), नांदेड (32), यवतमाळ (25).

यंदाच्या पावसाचा आलेख …

भारत : सरासरी पेक्षा 1 टक्का कमी
महाराष्ट्र: 19 टक्के जास्त
कोकण :24 टक्के जास्त
मध्यमहाराष्ट्र :16 टक्के जास्त
मराठवाडा : 48 टक्के जास्त
विदर्भ :3 टक्के जास्त
मुंबई शहर 15.4 टक्के जास्त
पुणे जिल्हा: 4 टक्के
पुणे शहर उणे 22 टक्के

तिसर्‍यांदा लांबलेला मान्सून..

1961 :1 ऑक्टोबर
2019: 9 ऑक्टोबर
2021: 6 ऑक्टोबर

Back to top button