पुणे : शाळा बंद न ठेवण्याचा होता जि. प.चा आदेश | पुढारी

पुणे : शाळा बंद न ठेवण्याचा होता जि. प.चा आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी येथील अधिवेशनासाठी शिक्षक बुधवारपासून गेल्याने जिल्ह्यातील शाळा बंद राहिल्या आहेत. तर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ शिक्षक अधिवेशनास जाण्यासाठी रजा मंजूर केली आहे; परंतु एकाच शाळेवरील सर्वच्या सर्व शिक्षकांना सरसकट या रजा घेता येणार नाहीत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या होत्या.

प्राथमिक शिक्षकांच्या दोन संघटनांच्यावतीने दोन 0अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार बुधवार (दि. 15) ते शुक्रवार (दि. 17) या कालावधीत ही शिक्षक अधिवेशने होणार आहेत. त्यानंतर 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री तर, 19 फेब्रुवारीला रविवारची सुट्टी जोडून आली आहे. यामुळे अधिवेशनकाळातील तीन दिवस आणि सरकारी सुट्ट्यांचे दोन दिवस मिळून सलग पाच दिवस सुट्टी मिळाली आहे.

शिक्षकांनी याबाबतचे योग्य नियोजन करावे आणि अधिवेशनकाळात एकही जिल्हा परिषद शाळा बंद राहणार नाही याचे योग्य नियोजन करण्याचा आदेश आयुष प्रसाद यांनी शाळांना दिला आहे. दरम्यान, केवळ अधिवेशनासाठी जाणार्‍या शिक्षकांनीच रजा घेतलेली असावी. मात्र, अधिवेशनाच्या नावाखाली रजा घेऊन, इथेच फिरणार्‍या शिक्षकांची रजा मंजूर केली जाणार नाही. असे सांगितले.

Back to top button