पुणे : विम्याच्या रकमेसाठी लाच स्वीकारताना दोघांना अटक | पुढारी

पुणे : विम्याच्या रकमेसाठी लाच स्वीकारताना दोघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम मजूर महिलेच्या निधनानंतर मिळणारी 2 लाख 34 हजार रुपयांची विमा रक्कम मिळवून देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी दहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
योगिता अरुण शेंडगे (वय 40, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), फारूक हनिफ पठाण (वय 56, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदाराच्या आईचे फेब्रुवारी 2022 मध्ये निधन झाले. त्यांची बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये बांधकाम मजूर म्हणून नोंदणी असल्याने त्यांना कामगार विमा म्हणून 2 लाख 34 हजार रुपये कामगार कार्यालयाकडून मिळणार होते. त्यासाठी तक्रारदार कामगार कार्यालयात आले होते. त्या वेळी योगिता शेंडगे यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली.

त्यापैकी अ‍ॅडव्हान्स म्हणून 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करीत

Back to top button