

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी (ता. खेड) येथील टोल इंडिया लॉजीस्टिक कंपनीतील 14 नोंदणीकृत माथाडी कामगारांवर महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माथाडी कामगारांच्या संदर्भात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेल्या आठवड्यातील हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे माथाडीच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रकाश पडला आहे.
अभिजित धनंजय कुलकर्णी (वय 41, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे अधिक वृत्त असे, की खराबवाडी गावातील टोल इंडिया लॉजीस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ऑक्टोबर 2021 पासून ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत कंपनीत पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्डामार्फत टोळी क्रमांक 401 मधील एकूण 14 नोंदणीकृत माथाडी कामगार कामावर आहेत.
प्रभाकर रामदास तळेकर, कृष्णा बाबाजी चौधरी, राजेश किसन गुळवे, गणेश सीताराम जाधव, मोहन कोंडिबा थोरवे, प्रसाद जालिंदर कदम, स्वप्नील दीपक टेमकर, बाळासाहेब सीताराम गाढवे, संजय यशवंत नाईकरे, प्रशांत बबन तळेकर, नंदकुमार रामदास वायाळ, नवनाथ धोंडीभाऊ खंडाळगे, मोहन दौलत बोंबे व सोमनाथ वसंत बोंबे हे सर्व जण कंपनीमध्ये अनलोडिंग करिता येणारे ट्रान्सपोर्ट चालक यांच्याकडून नियमबाह्य पैशाची वसुली करीत होते. प्रत्येक गाडीमागे 200 ते 300 रुपयांप्रमाणे दररोज येणार्या गाड्यांपैकी 5 ते 10 गाड्यांच्या चालकांकडून सक्तीने पैशाची वसुली करीत होते. या रकमेतून महिन्याला 25 हजार ते 37 हजार 500 रुपये इतकी मोठी रक्कम खंडणी स्वरूपात वसूल केली जात होती.
गुन्हा दाखल झालेले वरील 14 माथाडी कामगारांनी ऑक्टोबर 2021 पासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत माल खाली करण्यासाठी एकूण खंडणी स्वरूपात 4 लाख ते 6 लाख रुपये घेतले असल्याचे फिर्यादी कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. वरील सर्व 14 माथाडी कामगारांवर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माथाडीच्या आडून अनेक कंपन्यांमध्ये असे आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत