अद्यापही थंडीचा जोर असल्याने गहू जोमात | पुढारी

अद्यापही थंडीचा जोर असल्याने गहू जोमात

निमगाव दावडी; पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारी महिना निम्मा सरत आला आहे, तरीसुद्धा थंडीचा कडाका अद्यापही आहे. या थंडीचा गहू, हरभरा, कांदा पिकांना फायदा होत आहे. या वर्षी गहू पीक घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. पाऊस यंदा जास्त प्रमाणात झाल्याने पाण्याची कमतरता नाही.

त्यात लांबलेली थंडी ही गव्हासाठी फायदेशीर ठरत असून, गव्हाची वाढ चांगली होत आहे आणि ओंबी देखील चांगली भरत आहे. सध्या सर्वत्र गव्हाची ओंबी भरण्याच्या स्थितीत पीक आहे. हवामान विभागाने फेब्रुवारी शेवटपर्यंत थंडीचा कडाका राहील, असे सांगितले आहे. त्यामुळे ओंबी जोमदार भरून पीक उत्पादनात चांगली वाढ होत आहे, असे गहू उत्पादक राहुल पोखरकर व बाळासाहेब वाळुंज यांनी सांगितले.

Back to top button