इंदापूर : टणुत आढळली बॉम्बसदृश्य वस्तू | पुढारी

इंदापूर : टणुत आढळली बॉम्बसदृश्य वस्तू

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात टणू या गावांमधील एका शेतकर्‍याच्या गोठ्यात सोमवारी (ता.13) सायंकाळी बॉम्ब सदृश वस्तू आढळली. यामुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पथक दाखल झाले होते. सदरची वस्तू ही बॉम्ब आहे की इतर काही याबाबत खात्रीलायक समजू शकले नाही. ही वस्तू विशेष पथकाकडे सोपवण्यात आली आहेत.

Back to top button