पुणे : महाराष्ट्र नागरीकरण वेगाने होणारे राज्य : मुख्यमंत्री | पुढारी

पुणे : महाराष्ट्र नागरीकरण वेगाने होणारे राज्य : मुख्यमंत्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नगररचना विभाग हा राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा विभाग असून, महाराष्ट्र सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारे राज्य आहे. पुढील सात वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत 50 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग 109 वा वर्धापन दिन आणि दुसर्‍या नगररचना परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी चित्रफितीद्वारे दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

या वेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, राज्याचे नगररचना संचालक पुणे अविनाश पाटील, नगररचना संचालक तसेच सहसचिव प्रतिभा भदाणे, उपसचिव विजय चौधरी, निवृत्त संचालक अरुण पाथरकर, श्रीरंग लांडगे, सुधाकर नागनुरे, के. एस. आकोडे आदी उपस्थित होते. वाढती लोकसंख्या आणि सभोवतालचे पर्यावरण यात संतुलन साधत विकास व्हावा, अशी अपेक्षा पीएमरआडीएचे आयुक्त महिवाल यांनी व्यक्त केली. संचालक पाटील म्हणाले, नगरविकास विभागाने डिजिटल नियोजनासाठी केंद्र शासनाकडे 1 हजार कोटी रुपये मिळण्यासाठी प्रस्ताव
दिला आहे.

Back to top button