पुणे: कसब्यातील मताधिक्य थोड्या दिवसांनी सांगू : चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे: कसब्यातील मताधिक्य थोड्या दिवसांनी सांगू : चंद्रकांत पाटील

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबापेठ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जाईल. निवडणूक किती मताधिक्यांनी जिंकली जाईल, हे थोड्या दिवसांनी सांगेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते. त्याकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नावाखाली अडीच वर्षे काहीच काम केले नाही. परंतु गेल्या सात महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केलेली विकासकामे पाहून कसबा पेठ आणि चिंचवडमधील मतदारांनी कोणाला विजयी करायचे याचा निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Back to top button