पुणे: व्यापार परवाना नसल्याने कँटोन्मेंट बोर्डाने केल्या तीन आस्थापना सील | पुढारी

पुणे: व्यापार परवाना नसल्याने कँटोन्मेंट बोर्डाने केल्या तीन आस्थापना सील

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी कॅन्टोन्मेंट्स कायदा, 2006 अंतर्गत आवश्यक व्यापार परवाना न मिळवता व्यापार करणाऱ्या आस्थापनांना सीलबंद करण्याची कारवाई सुरू केली आहे.

यावेळी एम जी रोड वरील छायोस, फातिमा नगर येथील काका हलवाई व चेतक बिर्याणी या तीन आस्थापनांचे चौकशी दरम्यान व्यापार परवाना नसल्याचे निदर्शनास आल्याने बोर्डाने ही आस्थापने सील बंद केली असल्याचे बोर्डातील महसूल विभागाचे गिरीश पवार यांनी सांगितले.

दरम्यान त्यांना अलीकडच्या काळात कोरोना साथीचा आजार आणि अग्निशमन खबरदारीच्या उपायांचे पालन लक्षात घेऊन व्यापार परवाना अर्ज करण्यासाठी वारंवार नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या. मात्र  याचे गांभीर्य न घेतल्यामुळे सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी  तीन खाण्याच्या आस्थापना सील केल्या आहेत.

Back to top button