धक्कादायक ! पुण्यात पती- पत्नीच्या वादात बापानेच केला पोटच्या मुलीचा खून | पुढारी

धक्कादायक ! पुण्यात पती- पत्नीच्या वादात बापानेच केला पोटच्या मुलीचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बापानेच खून केला आणि तिचा मृतदेह कॅनॉल मध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः बापाने ही विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खून केल्यानंतर आरोपी पित्याने मुलीचा  मृतदेह वाहत्या कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील दोन तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. विषारी औषध प्राशन केल्याने मयत मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वारगेट पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button