पुण्यातील कासट साडी सेंटरला भीषण आग | पुढारी

पुण्यातील कासट साडी सेंटरला भीषण आग

पुणे : पुण्यातील कर्वे रोडवरील कासट साडी सेंटरच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. मात्र काही वेळातच आग आटोक्यात आल्याने साडी सेंटरचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Back to top button